सोलापूर : जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाच्या जलजीवन मिशन योजनेत बरीच अनियमितता आणणाऱ्या तत्कालीन कार्यकारी अभियंता दीपक गोळी हे मागील दोन दिवस सुट्टी मध्ये सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये ठाण मांडून असल्याचे पाहायला मिळाले.
जिल्हा नियोजन समितीमध्ये कोळी यांच्या कारभारावर अनेक आमदारांनी नाराजी व्यक्त करत त्यांची चौकशी करण्याची मागणी केली त्यानुसार पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तीन बडया अधिकाऱ्यांची चौकशी समिती नेमणूक चौकशी केली. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर या कामांमध्ये मोठी अनियमितता आढळल्याचं समोर आलं. त्यातच दीपक कोळी यांनी आपली बदली औरंगाबादला करून घेतली.
या चौकशीनंतर 189 जलजीवन मिशनच्या दिलेल्या कामांमध्ये गोंधळ दिसून आला. त्या फाईली तपासण्याचे काम मागील महिन्याभरात प्रशासनाने केले. आता मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कोळींना नोटीस देऊन खुलासा मागवला आहे. खुलासा देण्याची मुदत संपल्याच्या शेवटच्या दिवशी कोळी जिल्हा परिषदेमध्ये हजर झाले. त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली, परंतु 189 पाहिली या सामान्य प्रशासन विभागाच्या कस्टडीमध्ये आहेत त्या सर्व फायली बघून मी खुलासा देतो असे कोळी यांनी वरिष्ठांना सांगितले.
त्यानुसार शनिवार आणि रविवारी सुट्टीच्या दिवसात कोळी हे जिल्हा परिषदेमध्ये बसून होते. त्यांनी सर्व 189 फाईल या काळात तपासल्याचे समजते त्यानुसार ते आपला खुलासा देणार आहेत अशी माहिती मिळाली. परंतु स्वतःच दिलेल्या मंजुऱ्या त्यात आढळलेली अनियमितता यामुळे कोळी यांच्यावर कारवाईची टांगती तलवार आहे हे मात्र नक्की.
















