सोलापूर : आज महाराष्ट्रातील दोन ज्येष्ठ नेत्यांना डिलीट पदवीदान समारंभ मराठवाडा विद्यापीठामध्ये देत असताना शिवद्रोही, महाराष्ट्रद्रोही राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल जे उपमर्द करणारे वक्तव्य केले आहे. त्याचा मी सकल मराठा समाज सोलापूर जिल्ह्याच्या वतीने जाहीर निषेध करतो.
छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे जगाच्या पाठीवर भूतकाळ वर्तमानकाळ व भविष्यकाळ याचे अचूक ज्ञान असलेले राजे होते. काही दिवसांपूर्वी त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले महाराष्ट्रातल्या महापुरुषांबद्दल बेजबाबदार वक्तव्य केले होते. महापुरुषांची एलर्जी असलेल्या राज्यपाल कोशारी यांना महाराष्ट्रातून तात्काळ हकालपट्टी करा.
माऊली पवार
सकल मराठा समाज सोलापूर जिल्हा



















