सोलापूर : केंद्रीय क्षयरोग विभाग ,दिल्ली यांच्या मार्गदर्शक सूचना नुसार, निक्षय मित्र योजना अंतर्गत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा क्षयरोग केंद्र येथील औषध निर्माण अधिकारी सरिता पात्रो यांचा मुलगा चि. तनवीर याच्या सातव्या वाढदिवासनिमित्त निक्षय मित्र या योजनेअंतर्गत 10 क्षयरुग्णाना प्रोटीन किट वाटप करण्यात आले.
या रुग्णांना पात्रो परिवाराने सहा महिन्यासाठी दत्तक घेतले आहे. याप्रसंगी, डॉ.लतीफ शेख, HOD ,डॉ. सय्यद, राजेंद्र पतंगे , जिल्हा कार्यक्रम समन्वयक विजय शेगर , युसूफ चौधरी, नागराज एलसंगी आदीसह कर्मचारी उपस्थित होते.
प्रारंभी विजय शेगर यांनी तनवीरला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला..
सरिता पात्रो यांनी निक्षय मित्र योजना अंतर्गत क्षयरुग्णांना सहा महिने आमच्या वतीने दर महिन्याला प्रोटीन किट देण्यात येणार असल्याचे सांगितले..





















