सोलापूर : तक्रारदार यांचेवर दाखल गुन्हयात उच्च न्यायालयाचे आदेशाप्रमाणे नॉमीनल अटक करुन जामीनावर सोडण्यासाठी व तपासात मदत करण्यासाठी २० हजार रूपये लाच स्विकारणारे तत्कालीन पोलीस उप निरीक्षक रार्जेराव सखाराम शिंदे नेमणूक लोहमार्ग पोलीस स्टेशन, सोलापूर यांना ५ वर्षे सक्त मजुरी कारावास व २ हजार रु. दंड तसेच कलम १३ (१) (ड) सह १३ (२) अन्वये ५ वर्षे सक्त मजुरी कारावास व २ हजार रु. दंड दोन्ही शिक्षा एकत्रीतपणे भोगणे अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे.
यातील तक्रारदार यांचेवर दाखल गुन्हयात उच्च न्यायालयाचे आदेशाप्रमाणे नॉमीनल अटक करुन जामीनावर सोडण्यासाठी व तपासात मदत करण्यासाठी तक्रारदार यांना तत्कालीन लोहमार्ग पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव सखाराम शिंदे यांनी २०, हजार रुपये लाचेची मागणी केली होती. त्यावरून त्यांनी अॅन्टी करप्शन ब्युरो, सोलापूरकडे संपर्क साधला असता अॅन्टी करप्शन व्युरो सोलापूरकडून लाचेसाठी सापळा लावण्यात आला होता. त्यामध्ये सर्जेराव शिंदे यांना लाच स्विकारल्यानंतर पकडण्यात आले होते.
त्यावरून सर्जेराव शिंदे याचेविरुद सदर बझार पोलीस स्टेशन येथे लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियम क. ७.१३ (१) (ड) सह १३ (२) प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्हयाचा तपास शंकर साळुंखे तत्कालीन पोलीस निरीक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, सोलापूर यानी करून शिंदे याच्या विरूध्द विशेष न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते. सदर केसमध्ये अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती रेखा पांढरे यांच्या कोर्टात होवून आरोपी सर्जेराव शिंदे यांना वरील गुन्हयात दोषी ठरवून ५ वर्षे सक्त मजुरी कारावास व २०००/- रु. दंड तसेच कलम १३ (१) (ड) राह १३ (२) अन्वये ५ वर्षे सक्त मजुरी कारावास व २०००/- रु. दंड दोन्ही शिक्षा एकत्रीतपणे भोगणे अशी शिक्षा सुनावली आहे. सरकार तर्फे सदर खटल्यात अॅड. अल्पना कुलकणी तर आरोपी तर्फे ऍड पाकळीकर यानी काम पाहले.






















