सोलापुरातील शहर उत्तर विधानसभा राष्ट्रवादीला सोडल्याने कर्जत जामखेड काँग्रेसला द्यावी अशी मागणी युवक काँग्रेसच्या वतीने शरद गुमटे यांनी केली आहे.
गत विधानसभा निवडणुकीत सोलापुरातील शहर उत्तर विधानसभा ही काँग्रेसची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला देण्यात आली होती यामुळे कर्जत जामखेड मतदारसंघ काँग्रेससाठी सोडण्यात यावा याबाबत नगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड हा मतदारसंघ १९६२ ते १९७२ पर्यंत एकनाथ निंबाळकर, १९८० ते १९८५ दगडू निकाळजी, १९९० विठ्ठल भैलुमे हे नेते या मतदार संघाचे नेतृत्व करीत होते नगर जिल्हा पण पूर्वाश्रमीपासून काँग्रेसची वर्षानुवर्षे ताकदीत आहे.
तरी आगामी होणाऱ्या विधानसभा पुनश्चः कर्जत जामखेड मतदारसंघ काँग्रेसकडे घेण्यात यावा प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्याकडे करण्यात आली. यावेळी शहर उत्तर विधानसभा अध्यक्ष महेश लोंढे, उपाध्यक्ष शरद गुमटे, आदित्य म्हमाने, बबलु जाधव, महेंद्र शिंदे, आप्पाजी गायकवाड, गणेश वाघमारे, ओम पवार व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



















