सोलापूर- रूपाभवानी मंदिरास काही दिवसांपुर्वी शासनाकडून तीर्थक्षेत्राचा ‘क’ वर्ग दर्जेचा मान्यता मिळाली असून आजवर कोणतेच सुशोभीकरण करण्यात आले नसल्याचे समोर आले आहे. काही दिवसातच शारदीय नवरात्र महोत्सवास सुरूवात होत असून रुपाभवानी मंदिर परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असल्याची दुर्दवी बाब समोर आली आहे. जवळच असलेल्या नाल्यातून दुर्गंधी पसरत असल्याची खंत वारंवार भक्तांकडून होत असते. दरवर्षी फक्त नवरात्र काळातच सुशोभीकरण व स्वच्छता मोहीम हाती घेण्यात येते अशी व्यथा नागरिकांकडून मांडल्या जात आहेत. नवरात्र ते कोजागिरी पौर्णिमेपर्यंत पहाटेपासूनच दूरवरून भक्तगण अनवाणी दर्शनासाठी येत असतात.
शहरात रुपाभवानी मंदिर ते अशोक चौक ते गुरुनानक चौक व रूपाभवानी मंदिर ते मधला मारुती ते सात रास्ता ते बस स्टँड ते रूपा भवानी मंदिर या मार्गावरून येत असतात. या मार्गावरील काही दिवे बंद असून पहाटे येणाऱ्या भक्तांना अडचण होण्याची शक्यता आहे. रस्त्यावर बारीक खडी व मोठे खड्डे पडले आहे. येणाऱ्या दोन दिवसात पालिकेच्या वतीने शहरातील मोठे मार्ग व देवी मंडप शेजारील खड्डे त्वरित बुजवून घ्यावे अशी मागणी मंदिर परिसर स्वच्छता पाहणी प्रसंगी माजी नगरसेवक सुरेश पाटील यांनी केली. या पाहणी प्रसंगी नगर अभियंता संदीप कारंजे, उप अभियंता शांताराम अवताडे, विभागीय अधिकारी अविनाश वाघमारे, अवेक्षक राहुल कांबळे, कु.अंजना कोने मुख्य आरोग्य निरीक्षक वि.का.२ नडीमेटला, आरोग्य निरीक्षक बसवराज जमादार, विद्युत अवेक्षक शिवाजी मोरे, विद्युत सहा. अभियंता राजेश परदेशी आदी अधिकारी उपस्थित होते.
यावेळी ट्रस्टी अध्यक्ष मलिनाथ लातुरे, उपाध्यक्ष संताजी भोळे, माजी नगरसेवक प्रमोद काशीद, संजय होमकर, जगन्नाथ बंडगर, अप्पासाहेब कोनाळी, संजू पवार, अरुण लातुरे, राजू पवार, प्रवीण कोनाळी, अक्षय अंजिखाने, सागर अतनुरे, अवताडे, झेड ओ वाघमारे, राहुल कांबळे, यल्लप्पा कर्ली, विजय कोळी व इतर सभासद व भक्तगण उपस्थित होते.



















