रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे प्रदेश उपाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांनी यंदाची महापालिका निवडणूक पूर्ण ताकदीने लढवण्याची भाषा केली, यंदा सोलापूर महापालिकेत काहीही करून 5 नगरसेवक रिपाइं आठवले गटाचे पाठवणारच असा दावा त्यांनी केला.
देशात रिपाइंची भारतीय जनता पक्षासोबत युती आहे, सोलापूरात ही युती दिसेल का?असा सवाल केला असता यावेळी रिपाई एकला चलो च्या भूमिकेत आहे. भाजपकडे एकहाती सत्ता दिली, काय शहराची परिस्थिती झाली पहिली का? पाणी आठ आठ दिवसाला येते, यांना पाच वर्षात बजेट व्यवस्थित करता आले नाही, स्मार्ट सिटी योजनेच्या महापौर या संचालक असतात त्याच स्मार्ट सिटीच्या कामा विरोधात आंदोलन करतात ही भाजपची नाचक्की आहे. मग अशा पक्षासोबत युती कशी करायची.
स्थानिक पातळीवरच्या निवडणुका असल्याने युती करायचा अधिकार त्या त्या ठिकाणच्या नेत्याला आहे. आणि भाजपचे यंदा बोटावर मोजण्याइतकेच नगरसेवक निवडून येतील असा टोला राजाभाऊ सरवदे यांनी हाणला.
निवडणुकीमध्ये एमआयएम या पक्षाची ज्या पद्धतीने वातावरण निर्मिती होते तशी रिपाइं आठवले गटाची का होत नाही? असा प्रश्न केला असता लोकांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया करून केवळ काम करून घ्यायचे आहेत पण मतदान करायला हात पुढे सरकत नाही मात्र यंदा आम्ही रिपाइला मतदान होईल अशा पद्धतीने ग्राउंड पातळीवर तयारी केली आहे. भविष्यात एमआयएम सोबत पक्ष जाईल का असा प्रश्न केला असता त्या त्या वेळेची राजकीय परिस्थिती आणि गरज पाहून एमआयएम काय तर इतर पक्षासोबत ही ऍडजेस्टमेंट करू मात्र यंदा काही करून महानगरपालिकेत रिपाइंचे पाच नगरसेवक पाठवणारच अशी भीमगर्जना सरवदे यांनी यावेळी बोलताना केली.




















