सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी शहर कार्याध्यक्षपदी इरफान शेख यांची निवड करण्यात आली आहे.
नागपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विविध सेलच्या माध्यमातून व सामाजिक काम करणाऱ्या व तसेच गरीब कुटुंबातील कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या कार्यकर्त्याला राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी ओबीसीचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे, अल्पसंख्यांकचे प्रदेश महासचिव फारूक मटके, ज्येष्ठ नेते दिवाकर गमे, आदी मान्यवर उपस्थित होते.



















