सोलापूर : वरिष्ठांच्या सुचनांकडे दुर्लक्ष करून कार्यकर्त्याच्या मध्ये व महाविकास आघाडीमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण करत आहात. त्याकरिता आपले श्रेष्ठीच्या आदेशावरून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातून हाकलपट्टी करण्यात येत आहे. असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष भारत जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश युवक उपाध्यक्ष प्रशांत बाबर यांना पक्षातून हकालपट्टी केल्याचे पत्र काढले.
दरम्यान याबाबत बातम्या प्रसिद्ध होताच सर्व पक्षातून भारत जाधव यांच्यावर टीका होऊ लागली आहे. भारत जाधव यांना प्रोटोकॉल माहीत नाही का? व्वा रे शहराध्यक्ष ! प्रदेश युवक उपाध्यक्षाची हकालपट्टी ते करू शकतात का? त्यांना पक्षाच्या नियमांची माहिती नाही का? हे बहुतेक कोणालातरी खुश करण्यासाठी काढलेले पत्र असावे अशी टीका इतर राजकीय पक्षातून होत आहे.
दरम्यान या प्रकरणी प्रशांत बाबर यांची प्रतिक्रिया घेतली असता भारत जाधव यांचा पत्राला महत्त्व नाही कोणाच्या तर सांगण्यावरून त्यांनी हे पत्र काढलेले आहे. मी पक्षांमध्ये वीस वर्षापासून काम करतो मला सर्व नियम प्रोटोकॉल माहीत आहेत, आपण पक्षाची किंवा नेत्यांची प्रतिभा मलीन होईल असे कोणतेही काम केले नाही.



















