सोलापूर : भारतीय जनता पार्टीचे आमदार विजयकुमार देशमुख यांची आणि त्यांचे राजकीय विरोधक राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माजी महापौर मनोहर सपाटे या दोन नेत्यांची भेट जिल्हा नियोजन भवनासमोर झाली. यावेळी या दोघांनी एकमेकांना हस्तांदोलन केले हस्तांदोलन करताना विजयकुमार देशमुख यांनी सपाटे यांचा हात आपल्या डोक्यावर घेत आजपर्यंत सपाटे यांचा आशीर्वाद मला राहिला आहे यापुढेही असाच राहू द्या असे म्हणतात उपस्थित पत्रकारांना मध्ये एकच हशा पिकला पहा मजेदार व्हिडिओ😀😀😀
भाजपचे सरचिटणीस बिज्जू प्रधाने यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या कार्यक्रमांमध्ये मनोहर सपाटे यांनी तब्बल एक तास भाषण करताना भारतीय जनता पार्टीला धुऊन काढले, त्यामध्ये आमदार विजयकुमार देशमुख व आमदार सुभाष देशमुख यांच्यावर तोंडसुख घेताना आता भारतीय जनता पार्टीचे सोलापुरातील जहाज बुडणार आहे असे भाष्य केले होते. त्याची सर्वत्र चर्चा झाली.

















