सोलापूर : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी हे 24 दिवस मसुरी येथे ट्रेनिंगसाठी जात आहेत. त्यांचा अतिरिक्त पदभार सहाय्यक जिल्हाधिकारी मनीषा आव्हाळे यांच्याकडे स्वामी यांनी दुपारी सोपवून ट्रेनिंगसाठी कार्यमुक्त झाले आहेत.
दरम्यान जिल्हा परिषदेतील सर्व पत्रकारांनी आव्हाळे यांची भेट घेऊन स्वागत करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, मी आजच चार्ज घेतला आहे, मी केवळ एक महिना या खुर्चीवर बसले असून सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेऊन आढावा घेतला आहे. जिल्हा नियोजन समितीचा निधी खर्चाचे टार्गेट आहे, याद्या पाहून लवकरात लवकर प्रशासकीय मान्यता देण्यावर फोकस राहणार असून जलजीवन मिशन योजनेच्या कामांची गती वाढविण्यासह लंपी हा आजार नियंत्रीत ठेवण्यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे.
माझ्याकडे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी हा पदभार सोडून इतर दोन पदभार आहेत मात्र त्याठिकाणी कोणत्याही फाईल पेंडिंग नाहीत. हे काम बघत मी तेही करू शकते. जिल्हा परिषदेचे जे काम आहे ते जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व स्वामी सरांच्या मार्गदर्शनाखाली राहील असेही त्यांनी सांगितले.
पदभार घेतल्यानंतर त्यांचे स्वागत करण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांची गर्दी पहायला मिळाली.




















