सोलापूर : भूसंपादन वाटपात तब्बल पावणे तीन कोटी जादा वाटप करून पदाचा गैरवापर केल्याचा ठपका असलेल्या उपविभागीय अधिकारी क्रमांक एकचे हेमंत निकम यांची सातारा जिल्ह्यातील वाई येथे बदली झाली. त्यांच्या बदल्यात दुसरा अधिकारी देण्यात आला नाही.
निकम यांची चौकशी लागल्याने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी त्यांना त्वरित रिलिव्ह केले आहे. त्यांच्या जागेवर भूसंपादन क्रमांक सातचे उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांच्याकडे पदभार दिला आहे. तसा आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाने बुधवारी काढला.
उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांना यापूर्वी निवासी उपजिल्हाधिकारी यांचाही काही दिवस पदभार देण्यात आला होता. आता ही क्रिमी पोस्ट त्यांना मिळाली आहे.



















