सोलापूर : सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या ओबीसी आरक्षणा नुसार घ्याव्यात असे निर्देश दिले. त्यामुळे महानगरपालिका निवडणुकीसाठी निश्चित झालेले आरक्षण सोडत पुन्हा काढावे लागणार आहे. जिल्हा परिषदेत व पंचायत समितीचे आरक्षण सोडत ज्या दिवशी होती त्याच दिवशी निवडणूक आयोगाने पत्र काढून आरक्षण सोडत स्थगित केली होती.
आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या ओबीसी आरक्षणा नुसार होणार आहेत. शुक्रवारी राज्य निवडणूक आयोगाने आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला. सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी येत्या 29 जुलै रोजी आरक्षण सोडत होणार आहे तर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी येत्या 28 जुलै रोजी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे.





















