सोलापूर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रविवार 25 डिसेंबर 2022 रोजीचा सोलापूर जिल्हा दौरा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला आहे. सोलापूर शहराला ते धावती भेट देणार आहेत. या दौऱ्यात ते करमाळा येथील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याला भेट देऊन परत नागपूरला रवाना होणार आहेत. जिल्हा माहिती कार्यालयाकडून आला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा दौरा – रविवारी दुपारी 1.15 वा. सोलापूर विमानतळ येथे आगमन व हॅलिकॉप्टरने शेदगाव – भाळवणी, ता. करमाळा, जि. सोलापूरकडे प्रयाण, दुपारी 1.30 वा. आदिनाथ सहकारी साखर कारखाना लि., शेगाव भाळवणी, हेलिपॅड येथे आगमन. दुपारी 1. 35 वा. आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचा 27 वा ऊस गळीत हंगाम शुभारंभ, स्थळ : आदिनाथ सहकारी साखर कारखाना लि., शेदगांव भाळवणी, दुपारी 02.30 वा. शेदगाव- भाळवणी, ता. करमाळा येथून हेलिकॉप्टरने सोलापूर विमानतळाकडे प्रयाण, दुपारी 2.45 वा. सोलापूर विमानतळ येथे आगमन व शासकीय विमानाने नागपूरकडे प्रयाण.



















