सोलापूर : भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यकारिणीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात महाविजय मिळवण्यासाठी, मिशन महाविजय संकल्पना संयोजक पदी विधानपरिषद सदस्य श्रीकांत भारतीय यांची नियुक्ती केली होती.
या महत्वपूर्ण नियुक्तीनंतर प्रथमच श्रीकांत भारतीय पंढरपूर येथे विठुरायाचे व अक्कलकोट येथे स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन आज सोलापूर शहरात आले असता,त्यांचा भारतीय जनता पार्टी सोलापूर शहराच्या वतीने माजी शहराध्यक्ष प्रा.अशोक निंबर्गी, माजी नगरसेवक जगदीश पाटील, माजी शहर सरचिटणीस हेमंत पिंगळे, माजी नगरसेवक सुरेश पाटील व भाजयुमोचे अक्षय अंजिखाने, सागर अतनुरे व धीरज छपेकर यांनी भेट घेऊन त्यांचा महाविजय संयोजकपदी नियुक्ती झाल्याप्रित्यर्थ सत्कार केला व त्यांना येणाऱ्या लोकसभा निवडणुकीची रणनीती संदर्भात चर्चा केली.
याप्रसंगी बोलताना श्रीकांत भारतीय म्हणाले, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसभा निवडणुकीनंतर होणाऱ्या 2024 विधानसभा निवडणुकीत भाजप व बाळासाहेब ठाकरे(शिंदे गट) शिवसेनेचे जनतेचे सरकार पुन्हा राज्यात येण्यासाठी मी मला दिलेल्या जबाबदारीचा व संधीच सोन करेन असा विश्वास व्यक्त केला.



















