सोलापूर : माजी मंत्री तथा अक्कलकोटचे माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी शेतकरी व दुधनी बाजार समितीचे सभापती प्रथमेश म्हेत्रे यांच्या सोबत येऊन शुक्रवारी उशिरा निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांना निवेदन दिले. सोलापूर ते गुलबर्गा या राष्ट्रीय महामार्गाचे तसेच दुधनी रेल्वे पुलाचे काम धिम्या गतीने सुरू आहे, रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत, खड्डयामुळे नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे, रेल्वे पूल होत नसल्याने ही नागरिक हैराण झाले आहेत, कामे लवकरात लवकर सुरू करावीत अन्यथा रेल रोको आंदोलन करण्याचा इशारा म्हेत्रे यांनी दिला आहे. पहा ते काय म्हणाले


















