Sunday, March 22, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

महेश कोठे यांची राजकिय विश्वासार्हता किती? पक्ष आदला-बदलीने नुकसानच | स्पेशल रिपोर्ट

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
12 August 2022
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 






सोलापूर : महापालिकेच्या राजकारणात सोलापुरात महेश कोठे यांचा हात कुणी धरू शकत नाहीत. हे सर्वश्रुत आहे. त्यामुळेच खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी महापालिकेची जबाबदारी पूर्णपणे महेश कोठे यांच्या खांद्यावर दिली आहे. कोठे आल्याने राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जोरात इनकमिंग सुरू झाले. महेश कोठे राष्ट्रवादीत असल्याने काँग्रेस पक्षाच्या मोठ्या नेत्यांनी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. एमआयएमच्या नगरसेवकांनी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसलाच जवळ केले.  महापालिकेत सत्ता आणतो असे स्वप्न कोठे यांनी राष्ट्रवादीला दाखवले होते. 

अडीच वर्षे पूर्ण झाल्यानंतर राज्याच्या सत्तेत उलथापालथ झाली, शिवसेना फुटली, भाजपला जाऊन मिळाली. आता शिंदे गट व ठाकरेंची शिवसेना असं चित्र राज्यात तयार झालं आहे.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पंढरपूर दौऱ्यावर आले असताना कोठे यांनी आपल्या समर्थकांसह शिंदेंची भेट घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसशी घरोबा केलेल्या कोठे हे आता लांब लांब राहत असल्याचे चित्र आहे. 

दरम्यान अक्कलकोट जवळ एसटीचा अपघात झाला होता, त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी महेश कोठेंना फोन लावून चौकशी करण्यास सांगितले, नंतर कोठे यांच्या मोबाईल व्हिडीओ कॉल वर जखमींशी चर्चा करून धीर दिला. आता अशी चर्चा आहे की, शिंदे यांच्या गटातून कोठे हे विधान परिषदेसाठी प्रयत्न करीत आहेत. तसे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना त्यांनी सांगितले असून विधान परिषद निवडी पर्यंत थांबावे, त्यामुळे नेमके कोठे कोणाचे? अशी शंका उपस्थित केली जात आहे. 

2014 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव झाला, तिथून काँग्रेस गळतीला सुरुवात झाली. शहर मध्यचा विचार करून कोठे शिवसेनेच्या नेत्यांची भेट घेतली, प्रवेश पक्का केला. परंतु सोलापुरात आल्यानंतर मी काँग्रेस मध्येच राहणार असे सांगून काँग्रेसला झुलवत ठेवले. शिवसेनेकडून निवडणूक लढवली, पराभूत झाले. पुन्हा त्यांनी भाजप नेत्यांशी संपर्क वाढवला.


चंद्रकांत पाटील घरी येऊन गेले, 2019 च्या निवडणुकीत युती झाली, मध्य मधून तिकीट डावलण्यात आले. बंडखोरी करत त्यांनी निवडणूक लढवली. राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला, परत त्यांनी शिवसेनेत असल्याचं सांगत स्वतःला सावरून घेतले. शिवसेनेत ही त्यांचे मन रमेना, राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद पाहता ते शरद पवारांच्या संपर्कात आले. अनेक महिन्यापासून ते राष्ट्रवादी काँग्रेस सोबत होते, स्वतः शरद पवार हे कोठेंना ताकद देण्यासाठी सोलापुरात येऊन गेले.

आता परत सत्ता बदलली, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी त्यांचा संपर्क वाढला आहे. त्या गटाकडून ते आमदार होण्यासाठी प्रयत्न करत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे सोलापुरात महेश कोठे यांच्या राजकीय विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. 2009 साली काँग्रेस कडून निवडणूक लढवली होती, केवळ 10-12 हजाराच्या फरकाने त्यांचा पराभव झाला. त्यानंतर 2014 व 2019 च्या निवडणुकीत मोठ्या फरकाने मागे राहिले आहेत. पक्ष आदलाबदलीमुळे त्यांचे नुकसानच होत असल्याचे चित्र दिसत आहे.

SendShareTweetSend
Previous Post

महेश अण्णा गेले ‘कोठे’ ; या प्रश्नावर विद्या लोलगे व यु एन बेरीया यांनी दिले हे उत्तर ; खरटमल म्हणाले, आम्ही ‘ठोकून’ काम करणार

Next Post

जयंती मिरवणुकीत एकत्र येता तर…..; आमदार प्रणिती शिंदे यांनी मातंग समाजाला का केले आवाहन

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

जयंती मिरवणुकीत एकत्र येता तर.....; आमदार प्रणिती शिंदे यांनी मातंग समाजाला का केले आवाहन

ताज्या बातम्या

समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त जुळे सोलापुरात भक्तांची मांदियाळी ; हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त जुळे सोलापुरात भक्तांची मांदियाळी ; हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

21 March 2026
खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

16 March 2026
बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

15 March 2026
सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

12 March 2026
सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

10 March 2026
बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

9 March 2026
नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

4 March 2026
प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

27 February 2026

क्राईम

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1972953
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group