महाविकास आघाडीच्या पुणे शिक्षक मतदारसंघ उमेदवार मा. जयंत आसगावकर, पुणे पदवीधर मतदारसंघ उमेदवार मा. अरुण लाड यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करा :- सतेज पाटील
सोलापूर : काँग्रेस पक्षाचे नेते गृहराज्यमंत्री सतेज पाटील साहेब हे महाविकास आघाडीच्या पुणे शिक्षक मतदारसंघ उमेदवार मा. जयंत आसगावकर, पुणे पदवीधर उमेदवार मा. अरुण लाड यांच्या प्रचारार्थ सोलापुरात आले असता सोलापूर काँग्रेस भवनला भेट दिली यावेळी सोलापूर शहर कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी, यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी पदाधिकारी कार्यकर्त्यांशी बोलताना म्हणाले की महाविकास आघाडीच्या पुणे शिक्षक मतदारसंघ उमेदवार मा. जयंत आसगावकर, पुणे पदवीधर मतदारसंघ उमेदवार मा. अरुण लाड यांना निवडून शिक्षक आणि पदवीधर मतदारापर्यंत पोहोचुन दोन्ही उमेदवारांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावे असे विचार व्यक्त केले.
यावेळी माजी आमदार विश्वनाथ चाकोते सोमपा गटनेते चेतनभाऊ नरोटे, कार्याध्यक्ष अरुण शर्मा, महिला अध्यक्ष हेमाताई चिंचोळकर, नगरसेवक विनोद भोसले, प्रवीण निकाळजे, हाजी तौफीक हत्तुरे, नगरसेविका फिरदौस पटेल, अनुराधा काटकर, माजी नगरसेवक मनोज यलगुलवार, युवक काँग्रेस अध्यक्ष अंबादास बाबा करगुळे, NSUI जिल्हा अध्यक्ष गणेश डोंगरे, युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस सुमीत भोसले, अनुसूचित जाती विभाग जिल्हा अध्यक्ष गौरव खरात, परिवहन सदस्य तिरुपती परकीपंडला, ब्लॉक अध्यक्ष अरुण साठे, सैफन शेख, अंबादास गुत्तिकोंडा, किसन मेकाले गुरुजी, नागनाथ कदम, राजन कामत, हाजिमलंग नदाफ, राहुल वर्धा, शौकत पठाण, हारून शेख, अशोक कलशेट्टी, हसीब नदाफ, चक्रपाणी गज्जम, अनिल मस्के, पंडित सातपुते, उपेंद्र ठाकर, सूर्यकांत शेरखाने, कय्यूम बलोलखान, रजाक कादरी, राहुल बोळकोटे, प्रमिला तुपलवंडे, सुमन जाधव, नूर अहमद नालवार, सुभाष वाघमारे, महेश लोंढे, सचिन शिंदे, संजय गायकवाड़, राजाभाऊ महाडिक, सोपान थोरात, श्रीकांत दासरी, यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.