सोलापूर – महाआवास अभियाना मध्ये सोलापूर जिल्हा परिषदेस विभागीय स्तरावरील १२ पुरस्कार मिळाले आहेत. सिईओ दिलीप स्वामी यांचा या आठवड्यात दुसरा गौरव होत आहे.
पुणे विभागातून दरवर्षी महा आवास अभियान ग्रामीण अंतर्गत दि. ७ डिसेंबर रोजी विभागीय स्तरावरील पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करणेत आले आहे. विभागीय आयुक्त सौरभ राव यांचे हस्ते या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. सकाळी ११.३० वाजता झुंबर हाॅल मध्य पुरस्कार वितरण कार्यक्रम होणार आहे.
विभागीय स्तरावरील सर्वाधिक १२ पुरस्कार सोलापूर जिल्ह्सास मिळाले आहेत. या बद्दल पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील , जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी टीम चे अभियंनदन केले आहे. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील व उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे यांनी सिईओ दिलीप स्वामी यांचे स्वागत केले.
महसुल विभागाने देखील वाळु उपलब्ध करणे साठी चांगली कामगिरी केली आहे. सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गौरव करणेत आला होता. दरम्यान विभागीय स्तरावरील १२ पुरस्कारामुळे सोलापूर जिल्हा परिषदेचे शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. तत्कालीन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, विद्यमान प्रकल्प संचालक उमेशचंद्र कुलकर्णी व सर्व गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी व ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवक ग्रामीण विकास यंत्रणा विभागाची टीम यांनी चांगली कामगिरी केली आहे.
तत्कालीन
सर्वोत्कृष्ट जिल्ह्या मध्ये प्रधान मंत्री आवास योजना व राज्य पुरस्कृत आवास योजने मध्ये सोलापूर जिल्हा विभागात दुसरा आला आहे. या दोन प्रकारात दोन पुरस्कार जाहिर झाले आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी व प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांना निमंत्रीत करणेत आले आहे.
सर्वेोत्कृष्ठ तालुका- या प्रकारामध्ये राज्य पुरस्कृत आवास योजनेत अक्कलकोट, प्रथम , सांगोला (द्वितीय ) व माळशिरस ( तृतीय )या प्रकारातील तीनही पुरस्कार सोलापूर जिल्ह्याने पटकाविले आहेत.
पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी पुरस्कारासाठी निमंत्रीत करणेत आलो आहे. सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत- प्रकारामध्ये दक्षिण सोलापूर तालुक्यांतील निंबर्गी ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक पटकाविला तर मंद्रुप ग्रामपंचायतीचा तृतीय क्रमांक पटाकाविला आहे. सरपंच व ग्रामसेवक यांना निमंत्रीत करणेत आले आहे.
शासकीय जागा उपलब्ध करून देणेत सर्वेोत्कृष्ठ कामगिरी करणारे तालुके मध्ये माळशिरस तालुक्यांने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. गटविकास अधिकारी यांना यासाठी निमंत्रीत करणेत आले आहे. घरकुल साठी वाळू उपलब्ध करून देणारे तालुके मध्ये अक्कलकोट प्रथम तर मोहोळ तालुका द्वितीय आला असून या तालुक्यांतील तहसीलदार यांना निमंत्रीत करणेत आले आहे. या दोन ही प्रकारामध्ये या दोन तालुक्यांनी चांगली कामगिरी केली आहे. प्रधान मंत्री आवास योजना व राज्य पुरस्कार योजनेतील प्रथम व द्वितीय पुरस्कार पटकाविले आहेत.
सर्व कर्मचारी याचे मोठे योगदान – सिईओ दिलीप स्वामी
…………….
सोलापूर जिल्हा भौगोलिक दृष्ठ्या खुप मोठा आहे. असा स्थिती मध्ये सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी चांगली कामगिरी केली. सर्वाधिक १२ पुरस्कार जाहिर झाल आहेत. गरीबांना घरे देणे साठी आमच्या टीमने खुप मेहनत घेतली. एकाच वेळी प्रशासकीय मान्यता व आॅनलाईन द्वारे पहिला हप्ता वितरीत केले. या मुळे कामांना गती आली. असल्याचे सिईओ दिलीप स्वामी यांनी सांगितले.



















