सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील होत असलेल्या 17 ग्रामपंचायत निवडणुकीत रंगत वाढली आहे. स्थानिक नेत्यांसह विद्यमान आमदारांनी लक्ष घातल्याने मंद्रुप, निंबर्गी, कंदलगाव या मोठ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत चुरस आहे.
मंद्रुप ग्रामपंचायतवर आमदार सुभाष देशमुख समर्थकांचे वर्चस्व आहे. यंदा तीन पॅनलमध्ये निवडणूक होत आहे. भाजप पुरस्कृत पॅनल, मंद्रुपच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोरे गटाचे दुसरे पॅनल तर काँग्रेस नेते सुरेश हसापुरे समर्थकांचे तिसरे पॅनल एकमेकांसमोर उभे आहेत. काँग्रेसचे युवा नेते अनंत म्हेत्रे यांनी आपली भूमिका मांडताना मंद्रुपच्या घराणेशाही व हुकूमशाहीला मतदार यंदा जागा दाखविणार असल्याचा दावा केलाय पहा म्हेत्रे काय म्हणाले..


















