नुकतेच मंगळवेढा ‘तालुक्यातील नंदेश्वर येथील अशोक सदाशीव गरंडे, व सोमा कृष्णा गरंडे या वीजचोरांवर महावितरण कार्यालयाकडून कारवाई करण्यात आली. हि रोजी कार्यकारी अभियंता दत्तात्रय आसबे यांच्या पथकाकडून पाहणी असताना अशोक गवंडे, सोमा गवंडे हे शेतीकामी, घरगुती अशापद्धतीने वीजचोरी करताना आढळले त्यानुसार त्यांना कायदेशीर दंड भरण्याच्या सूचना करुन देखील शासनाचे देय रक्कम न भरल्याने या दोघांवर कायदेशीर वीजचोरीचा गुन्हा दाखल झाला असून पुढील कायदेशीर प्रक्रिया चालू आहे.
सदरच्या दोन्ही आरोपींवर खोटी माहितीच्या आधारे शासनाचा महसूल बुडवणे, चोरी, मारहाण अशा विविध स्वरुपाच्या गुन्ह्याची नोंद देखील स्थानिक पोलिस स्टेशनला असल्याने त्याचा ही तपास चालू आहे
सदरच्या विज चोरी बाबत मंगळवेढा पंढरपूर येथील महावितरण मुख्य कार्यकारी अभियंता संजय रामचंद्र गवळी यांनी अधिक माहिती दिली…

















