सोलापूर : पोलिसांची नजर चुकवून बेकायदेशीरपणे गांजा, गुटखा, पेट्रोल डिझेल विक्री करणाऱ्या ‘पैलवान’ आडनाव असलेल्या 28 वर्षीय युवकाला मंगळवेढा पोलिसांनी अटक केली आहे.
मंगळवेढा पोलीस ठाणेची हद्द मोठी असून सीमेलगत कर्नाटक राज्य, सांगली जिल्हा, यांची हद्द लागून आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात चोरट्या मार्गाने अवैद्य वस्तुचा वाहतुक व साठा होत असतो.
दि. 30 जुलै 2022 रोजी गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरुन मंगळवेढा पोलीस ठाणे कडील पोलीस निरीक्षक रणजित माने, सहा. पोलीस निरीक्षक बापुराव पिंगळे, सपोफो अविनाश पाटील, पोहेकॉ गायकवाड, पोहेकॉ हजरत पठाण, पोना बापुराव पवार, पोका राजु आवटे, पोकॉ वैभव घायाळ तसेच सोबत दोन पंच, तोलार, फोटोग्राफर असे मिळून त्याठिकाणी छापा टाकला असता, अक्षय बसवेश्वर पैलवान वय 28 वर्षे राहणार भोसे तालुका मंगळवेढा हा प्राथमिक आरोग्य केद्राच्या समोर मौजे भोसे येथे त्याच्या ताब्यात खालील प्रमाणे अवैद्य मुद्देमाल मिळुन आला.
त्याठिकाणी पोलिसांना 5000 रुपये एकुण 28 पुड्या गांजा त्याचे वजन 228 ग्रॅम कि.अं., 6000 रुपये सुगंधी तंबाखु 4 मोठे पॅकेट प्रत्येकी 1500 रु प्रमाणे कि.अ., 24960 रुपये विमल पान मसाला असलेली 4 मोठी पॅकेट प्रत्येकी 6240 रु प्रमाणे कि.अं., 15919 रुपये किमतीचे 3 निळ्या रंगाच्या कॅनमध्ये प्रत्येकी 50 लीटर प्रमाणे 150 लीटर पेट्रोल प्रती लीटर 106.13 रुपये प्रमाणे कि. अं., 69495 रुपये किमतीचे 15 निळ्या रंगाच्या कॅनमध्ये प्रती लीटर 92.66 रुपये असे एकूण प्रत्येकी 50 लीटर प्रमाणे 750 लीटर डिझेल असा एकूण 1,21,374 चा अवैद्य मुद्देमाल जप्त करण्यात आला. गुन्ह्यातील आरोपी अक्षय बसवेश्वर पैलवान पोलीसांच्या ताब्यात असून सदर गुन्ह्याचा तपास सपोनि बापुराव पिंगळे हे करीत आहेत.



















