पंढरपूर — मोहोळ ते पंढरपूर मार्गावर पेनुर नजीक कार आणि खाजगी बसच्या भीषण अपघातामध्ये पंढरपुरातील तीन युवकांचा जागीच मृत्यू झाला आहे. शुक्रवारी रात्री अकराच्या दरम्यान हा भीषण अपघात घडला. या तरुणांच्या मृत्यूने पंढरपूर शहरावर शोककळा पसरली.
पंढरपूर शहरातील विजापूर गल्लीमध्ये राहणारे हे तीन युवक होते. शुक्रवारी रात्री हवं तिघे मोहोळ वरून पंढरपूरकडे येत होते. समोरून चुकीच्या दिशेने आलेल्या खाजगी बसने युवकांच्या कारला धडक दिली.
यामध्ये ऋषिकेश साखरे वय २५, सुरज कदम वय २८, प्रशांत शेटे वय ४० सर्व राहणार विजापूर गल्ली, पंढरपूर या तीन युवकांचा जागीच मृत्यू झाला आहे. यापूर्वी याच मार्गावर असे अनेक मोठे अपघात झाले आहेत, हा महामार्ग अद्यापही पूर्ण झालेला नसल्याने भीषण अपघात होत असल्याचे समोर येत आहे.



















