सोलापूर : सोलापुरात युवक पॅंथरच्या वतीने पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष दीपक गवळी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शुभम बंगाळे, आदित्य वाघमारे, विकास सोनवणे, विश्वास नागमोडे, मुकेश बनसोडे, तुकाराम भोसले, सागर गायकवाड यांच्यासह संघटनेचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान दीपक गवळी यांनी सोलापूर समाज कल्याण कार्यालयातील सहाय्यक आयुक्त कैलास आढे, पुणे प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळंकी यांनी आश्रमशाळांना बेकादेशीरपणे अनुदान वाटप केले आहे, किसन पाटील या शिपायामार्फत कोट्यावधीतचा पैसा गोळा केला जात असल्याचा आरोप गवळी यांनी केला होता.
या प्रकरणाची इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय विभागाने गंभीर दखल घेतली असून या प्रकरणाच्या चौकशी साठी नाशिक समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त भगवान वीर यांना चौकशी अधिकारी नेमण्यात आले आहे. प्रकरणाची चौकशी करून अहवाल 15 दिवसात सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे सोलापूर समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त आडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.


















