सोलापूर : उपमहापौर राजेश काळे यांची तडीपार ऑर्डर विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी संपुष्टात आणली आहे. तसा निकाल त्यांनी 3 मार्च दिला या निकालानंतर राजेश काळे यांनी “मुद्दाई लाख बुरा चाहे तो क्या होता है, वही होता है जो मंजुरे खुदा होता है” असे सांगत मी पुन्हा त्याच ताकदीने आता सोलापुरात येत आहे. अशी प्रतिक्रिया दिली. 7 डिसेंबर 2021 रोजी उपमहापौर राजेश काळे यांना सोलापूर, उस्मानाबाद, तुळजापूर, इंदापूर या भागातून तडीपार करण्यात आले होते. त्यांच्यासोबत नगरसेवक नागेश गायकवाड यांचे चिरंजीव चेतन गायकवाड यालाही सोलापूर पोलीस उपायुक्तांनी तडीपार केले होते तेव्हापासून उपमहापौर काळे हे पुण्यामध्ये वास्तव्यास होते. तिथूनच त्यांनी आपले कामकाज सुरू ठेवले होते दरम्यानच्या काळात ज्येष्ठ नेते सुरेश पाटील आणि उपमहापौर राजेश काळे यांच्या मध्ये पक्षांतर्गत वाद झाला.
विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी आपल्या आदेशात, अपिलार्थी यांनी दाखल केलेल्या अपिलाची सुनावणी विभागीय आयुक्त पुणे यांचे न्यायालयात पुर्ण होऊन त्यामध्ये खालील प्रमाणे आदेश देण्यात आला आहे.
अपिल मान्य करणेत येत आहे. पोलीस उपआयुक्त (परिमंडळ), सोलापूर शहर यांचेकडील जा.क्र. पी. उप-आ. परि/निकाल/३८८६/२०२९ दिनांक ७/१२/२०२१ व जा.क्र. पो.उप आ. परि/आदेश/३८८७/२०२१ दिनांक ७/१२/२०२९ अन्वये पारीत केलेला निकाल व आदेश संपुष्टात आणणेत येत आहे.
















