सोलापूर : राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे मंत्री तसेच राज्यपालांकडून महापुरुषांबद्दल बदनामीकारक वक्तव्य वारंवार केले जात आहे. दोनच दिवसापूर्वी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या बाबत वादग्रस्त वक्तव्य करून रोष ओढावून घेतला आहे.
याच पार्श्वभूमीवर रविवारी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोलापूर दौऱ्यावर होते. विजापूर रोडवरील नेहरूनगर इथल्या मैदानावर गुरव समाजाचे अधिवेशन होते. या अधिवेशनाला मुख्यमंत्र्यांची एन्ट्री होतानाच भीमसैनिक आतिश बनसोडे यांनी त्यांना काळे झेंडे दाखवून निषेध नोंदवण्याचा प्रयत्न केला त्याच वेळेस उपस्थित पोलिसांनी त्यांना तात्काळ पकडले. पहा हा व्हिडिओ


















