सोलापूर : ईडीच्या वतीने काँग्रेस नेते राहुल गांधी जाणीवपूर्वक टार्गेट केले जात आहे. त्यांच्या निषेधार्थ सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी व ईडीचा प्रतिकात्मक पुतळा काँग्रेस भवनाच्या समोर जाळण्यात आला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
शहराध्यक्ष गणेश डोंगरे, प्रदेश सचिव प्रवीण जाधव, शहर मध्य अध्यक्ष वाहिद बिजापुरे, शहर उत्तर अध्यक्ष महेश लोंढे, जिल्हा मीडिया प्रमुख तिरुपती परकीपंडला, योगेश मार्गम, समीर काझी, वैभव माने यांच्यासह युवक काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
शहराध्यक्ष गणेश डोंगरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांचा निषेध नोंदवला, भाजप सूडबुद्धीने राहुल गांधी यांच्यावर ईडीच्या वतीने कारवाई करीत आहे जर राहुल गांधी यांना अटक झाली तर युवक काँग्रेस भाजपच्या कार्यालयासमोर आंदोलन करेल असा इशारा दिला.