सोलापूर : सोलापूरातील सिव्हील हॉस्पिटलला छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय, सोलापूर असे नाव असून तेथे सुध्दा सिन्हासनावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा व्हावा जेणे करुन रुग्णांच्या नातेवाईकांना अडचणीच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा मिळत राहील. पुतळा व त्या परिसराचे सुशोभिकरण व्हावे.
तसेच जिल्हा आरोग्य केंद्राकडून नव्याने होत असलेल्या महिला रुग्णालयास राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब महिला रुग्णालय असे नामकरण व्हावे या मागण्यांसाठी समिती स्थापन करून शहरातील प्रत्येक मंडळातील प्रमुखांना एकत्रित करून हे कार्य करण्याचा मानस छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती सोलापूर यांच्यावतीने पत्रकार परिषदेत करण्यात आली. दरम्यान अधिक माहिती निमंत्रक अमोल शिंदे यांनी दिली…
यावेळी निमंत्रक दिलीप कोल्हे, अनंत जाधव, दास शेळके, सुनील रसाळे, दत्तात्रय मुळे, शेखर फंड, तुकाराम मस्के, प्रशांत इंगळे, विनायक महिंद्रकर, संजय शिंदे, शशी थोरात, हेमंत पिंगळे, बाळासाहेब पुणेकर, रवी मोहिते, राजू सुपाते, किरण पवार व शिवभक्तमोठ्या संख्येने उपस्थित होते.



















