सोलापूर : महानगरपालिकेचा मिळकत कर चुकवल्याप्रकरणी महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला असून तीन शिक्षण संस्था सील करण्यात आल्या आहेत.
यामध्ये प्रामुख्याने सिंहगड या नावाजलेल्या शिक्षण संस्थेचा समावेश आहे. महापालिकेच्या उपायुक्त विद्या पोळ यांनी ही माहिती दिली. त्याचबरोबर सुमारे दोन कोटीची कर वसुली सुद्धा गुरुवारी एका दिवसात करण्यात आली आहे.
सील करण्यात आलेल्या शिक्षण संस्थांमध्ये सिंहगड कॉलेज, महात्मा बसवेश्वर शिक्षण मंडळ, सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ व भारतरत्न इंदिरा कॉलेज यांचा समावेश आहे.





















