सोलापूर : राज्यातून राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता गेली तसे पदाधिकारी कार्यकर्ते पळू लागल्याचे चित्र आहे. सोलापुरात तब्बल तीस हून अधिक युवक आघाडीतील पदाधिकाऱ्यांनी आपल्या सदस्यत्व पदाचे राजीनामे शहराचे अध्यक्ष भारत जाधव यांच्याकडे दिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे शहर अध्यक्ष सागर शितोळे यांच्या नेतृत्वाखाली हे सर्व एकत्र आले आहेत.
या सर्व पदाधिकाऱ्यांनी शासकीय विश्राम गृहात एकत्र येत आपण सर्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात जात असल्याचे जाहीर केले आहे. यावेळी शिंदे गटाचे मनीष काळजे उपस्थित होते. सर्वांनी सोलापुरात मनोज शेजवाळ यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचे जाहीर केले आहे. पहा कोण कोण गेले शिंदे गटात ही यादी



















