सोलापूर : आगामी काळात विविध जातीधर्माचे सण-उत्सव, जयंती मिरवणुका व महानगरपालिका निवडणुकच्या दरम्यान सोलापूर शहरात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून शहरात कायदा सुव्यवस्था तसेच शांतता अबाधित राहण्याच्या अनुषंगाने सोलापूर शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत विजापूर नाका पो.स्टे. व एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हे करणारा सराईत गुन्हेगार नामे महिबूब ऊर्फ दोला चाँदसाब मुजावर, वय ४० वर्षे, रा.घ.नं. १०८, साईनाथनगर, भाग-२, मजरेवाडी, सोलापूर याचेविरूध्द मारामारी, दमदाटी, घरफोडी करणे, शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, पोलीसांची नजर चुकवून स्वतःच्या फायद्याकरीता बेकायदेशीररित्या घरगुती गॅस इंधन म्हणून रिक्षा व वाहन चालकांना विक्री करणे असे विजापुर नाका पोलीस स्टेशन व एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन येथे अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे एकुण १२ गुन्हे दाखल आहे. त्यामुळे त्याचेविरूध्द महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५६(१) (अ) (ब) प्रमाणे मा. पोलीस उपायुक्त परिमंडळ साो, सोलापूर शहर यांचे आदेशाने दि. ०२/०९/२०२२ रोजी सोलापूर शहर व जिल्हा, उस्मानाबाद जिल्हा तसेच पुणे जिल्हयातील इंदापूर तालुक्यातून दोन वर्षाकरीता तडीपार करण्यात आलेले आहे.





















