सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे या शुक्रवारी सोलापूर दौऱ्यावर होत्या. त्यांनी शासकीय विश्रामगृहात सकाळी पत्रकारांशी संवाद साधला. भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीत बारामती या मतदारसंघावर फोकस केला आहे त्याकडे आपण कसे पाहता या प्रश्नावर बोलताना खासदार सुळे म्हणाल्या, भाजपला बारामती हवं हवं वाटणं हीच माझ्या कामाची पोच पावती असून मी भारतीय जनता लॉड्रीचे आभार मानते. पहा त्या काय म्हणाल्या हा व्हिडीओ…
या पत्रकार परिषदेस आमदार यशवंत माने, जिल्हाध्यक्ष काका साठे, शहराध्यक्ष भारत जाधव, जिल्हा कार्याध्यक्ष उमेश पाटील, प्रदेश सचिव संतोष पवार, महेश गादेकर, पश्चिम विभागीय अध्यक्ष कविता म्हेत्रे, महिला शहराध्यक्ष सुनीता रोटे, नलिनी चंदेले यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.



















