सोलापूर : पंढरपूर येथील सार्वजनिक बांधकाम खात्यात 15 हजार रुपये लाच घेताना कारकुनाला अँटी करप्शन सोलापूर युनिटने अटक केली आहे. चंद्रकांत अभिमन्यू टोनपे (वय 58 वर्ष,) असे त्या कारकूनचे नाव असून यावर पंढरपूर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
यातील तक्रारदार यांनी त्यांची जमीन ही वाणिज्य व्यवसाय प्रयोजनासाठी बिगर शेती (एन.ए) करणेसाठी दि. 13.06.2022 रोजी उप विभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, कार्यालय पंढपूर येथे अर्ज सादर केला होता.
सदर अर्जाचा पाठपुरावा यातील तक्रारदार करीत असताना आलोसे चंद्रकांत अभिमन्यू टोणपे वय 58 वर्षे, पद भांडार कारकुन, नेम- उप विभागीय अभियंता कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग, पंढरपूर यांनी सदर शेतजमीन बिगर शेती (एन.ए) करण्याकरीता ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी तक्रारदार यांचेकडे 30,000/- रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती 15,000/- रुपये स्विकारण्याचे मान्य करून सदर लाच ठाकरे चौक, नवीन कुराड नाका येथे घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे.