सोलापूर : चीन देशामध्ये वाढत असलेला कोरोनाच्या संसर्ग त्या पार्श्वभूमीवर भारत देशाने मास्कची सक्ती करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात राज्य सरकारकडून अद्याप कोणत्याही मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आलेल्या नाहीत.
शिर्डीच्या साईबाबा मंदिरात भाविकांना चेहऱ्यावर मास्कची सक्ती करण्यात आली आहे. त्याचा अनुषंगाने पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात देवस्थान समितीचे अध्यक्ष हरिभक्त पारायणकार गहिनीनाथ औसेकर महाराज व मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी तुषार ठोंबरे यांच्यात बैठक झाली.
या बैठकीत मंदिरात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता मास्कची सक्ती करण्यात आली आहे. मात्र भाविकांना तशी कोणतीही सक्ती अद्यापही करण्यात आली नसली तरी मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या वयोवृद्ध नागरिकांनी आपल्या तोंडावर मास्क लावावा असे आवाहन कार्यकारी अधिकारी ठोंबरे यांनी केले आहे. ठोंबरे यांनी केलेले आवाहन पहा हा व्हिडिओ



















