दक्षिण सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप निम्बर्गी या दोन ग्रामपंचायतच्या निवडणुकीकडे सध्या संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे. निम्बर्गी गावच्या सरपंच पदासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश हसापुरे यांचे चिरंजीव श्रीदीप हसापुरे हे उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. त्यांच्या विरोधात चन्नप्पा बोरगी हे उमेदवार आहेत.
दरम्यान सोमवारच्या अर्ज छावणीत बोरगी यांच्या अर्जाला बसवराज माळगे यांनी हरकत घेतली आहे.
हरकतीत म्हटले की, सरपंच पदाचे उमेदवार चन्नप्पा बोरगी 2013-14 पासून स्वतः जेसीबी लावून कॉन्ट्रॅक्टरचे काम करत होते. 9 हजार व 5 हजारचे चेक स्वतःच्या नावाने उचलले आहेत 2013-14 ते पुढील10 वर्ष मी ग्रामपंचायत ठेकेदार काम करण्यास तयार म्हणून करारनामा करून दिला असे असताना नामनिर्देशन पत्रात मी ठेकेदार नाही म्हणून माहिती दिली, स्वघोषणा पत्र केले आणि शासनाची माहिती लपवली, सदर अर्जाला बसवराज माळगे निंबर्गी यांनी हरकत घेतली आहे.
तसेच पॅनल मधील इतर अर्जावर ही हरकती असून अतिक्रमण नोंद डायरीत ग्रामपंचायतच्या अतिक्रमण केलेले नावे असून मी अतिक्रमण केले नाही म्हणून घोषणापत्र दिले, चुकीचे घोषणापत्र दिले म्हणून आता कारवाई होणार का? याकडे दक्षिण सोलापूर तालुक्याचे लक्ष लागले आहे.



















