सोलापूर : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोशारी यांनी राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर उमटले आहेत. राज्यपालांनी रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांची माफी मागावी यासाठी राज्यातील शिवप्रेमी आक्रमक झाले आहेत.
याच दरम्यान सोलापुरात राज्यपाल भगतसिंग कोशारी यांचा चार मार्च रोजी संभाव्य दौरा आहे या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी शिवप्रेमींची बैठक डाळिंबी आड या ठिकाणी झाली.
या बैठकीला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव, शिवसेनेचे शहरप्रमुख गुरुशांत दुत्तरगावकर, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष संतोष पवार, राजन जाधव, श्रीकांत डांगे, माऊली पवार, दिपक वाडदेकर, दास शेळके, विनोद भोसले, श्रीकांत घाडगे, नाना काळे, मतीन बागवान यांच्यासह शेकडो शिवप्रेमी उपस्थित होते.
यावेळी बोलताना शिवप्रेमींनी येणाऱ्या चार मार्च रोजी राज्यपालांनी माफी न मागितल्यास त्यांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी सुमारे 20 हजार शिवप्रेमी एकत्र येऊन त्यांचा निषेध करतील त्याचबरोबर संपूर्ण जिल्ह्यात सकाळी साडेदहा ते अकरा या वेळेत रास्ता रोको आंदोलन होईल यावेळी सकल मराठा समन्वयक माऊली पवार यांनी तर राज्यपाल सोलापुरातून सुखरूप जाणार नाहीत असा इशारा दिला पहा कोण काय म्हणाले…

















