सोलापूर शहरामध्ये आपला उद्देश साध्य करण्याच्या हेतूने घातक शस्त्रानीशी गैरकायद्याची मंडळी जमवून दुखापत करणे, साथीदारासह नागरीकांना शिवागाळ व मारहाण करुन दहशत निर्माण करणे इत्यादी गंभीर स्वरुपाचे गुन्हे करणा-या सचिन उर्फ बॉबी संभाजी शिंदे, वय – ३९ वर्षे, रा. हौसे वस्ती, आमराई, सोलापूर या इसमास सोलापूर शहर, उर्वरीत सोलापूर जिल्हा, पुणे जिल्हयातील इंदापूर तालूका व उस्मानाबाद जिल्हा येथून दोन वर्षे या कलावधीकरीता तडीपार करण्यात आले होते. सदर तडीपार आदेशाविरुध्द तडीपार इसमाने विभागीय आयुक्त, पुणे यांच्याकडे अपील दाखल केले होते.
विभागीय आयुक्त, पुणे यांनी सदरचे अपील अंशत: मान्य करुन सोलापूर शहर पोलीस उपआयुक्तालय परिमंडळ हद्द व त्यालगतचे ग्रामीण तालुका हद्द दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, मोहोळ, अक्कलकोट तालुका या हद्दीतून दोन वर्षाकरीता तडीपार करण्यात येत आहे असा आदेश दिला आहे. तद्नंतर तडीपार इसम याने सदर तडीपार आदेशाविरुध्द मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे रिट पिटीशन दाखल केले होते. सदर रिट पिटीशनची सुनावणी घेवून मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी तडीपार आदेश कायम ठेवून रिट पिटीशनचा अर्ज फेटाळला आहे.



















