सोलापूर : सोलापूर शहराजवळ असलेल्या कुमटे ते मद्रे रोडवर दुचाकीवर जाणाऱ्या 19 वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांला क्रूझर गाडीने जोराची धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. विकास लोको चव्हाण राहणार घोडा तांडा दक्षिण सोलापूर असे मरण पावलेल्याचे नाव आहे.
ही घटना सकाळी साडेआठ ते नऊच्या दरम्यान घडली असून विकास चव्हाण हा आपल्या एचएफ डीलक्स क्रमांक MH13BN1837 या गाडीवरून कुमठे गावातील कॉलेजला जात होता त्यावेळी भरधाव वेगाने येणारे अज्ञात क्रुझर गाडीने त्याला जोराची धडक दिली क्रूजर गाडी चालक फरार झाला असून विकास चव्हाण यांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी येऊन मोठ्या प्रमाणात आक्रोश केला आहे.
घटनेची माहिती मिळताच विजापूर नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी तसेच पोलीस पथक दाखल झाले. नातेवाईकांनी जोपर्यंत कार चालकास अटक करत नाहीत तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका घेतली होती त्यावेळी पोलिसांनी समजूत काढून मृतदेह सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोच्च रुग्णालय या ठिकाणी शवविच्छेदनासाठी पाठवून दिला आहे.




















