सोलापूर : सोलापूर शहर युवक काँग्रेस अध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे NSUI जिल्हाध्यक्ष गणेश डोंगरे यांची निवड झाली आहे तर त्याच पद्धतीने जिल्हा युवक अध्यक्षपदी पंढरपूरच्या सुनंजय पवार यांनी बाजी मारली आहे. युवक काँग्रेसच्या झालेल्या मतदानात डोंगरे आणि पवार यांनी सर्वाधिक मते घेतल्याने त्यांच्या निवडी झाल्या आहेत. काँग्रेस पक्षाने युवकांमध्ये ऑनलाइन मतदान करून पदाधिकार्यांच्या निवडी करण्याचे हाती घेतले त्या पद्धतीने सोलापुरात शहराध्यक्ष पदासाठी अनेक जण इच्छुक होते. सुरुवातीला काही दिवस सर्व इच्छुकांना आपापल्या पद्धतीने मतदान प्रक्रिया सुरू ठेवण्याच्या सूचना होत्या त्यानंतर आमदार प्रणिती शिंदे यांनी जो ठरवेल त्यालाच यापुढे मतदान होईल असे ठरले त्यानुसार आमदार शिंदे यांनी शहर अध्यक्ष पदासाठी गणेश डोंगरे यांचे नाव सुचवले होते . आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने या निवडीला महत्त्व प्राप्त झाले आहे. यापूर्वी अंबादास करगुळे यांनी युवक अध्यक्ष म्हणून काम करताना काँग्रेसची ताकद वाढविण्यासाठी प्रयत्न केले. त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर डोंगरे याना त्याठिकाणी संधी मिळाली आहे. काँग्रेस पक्षश्रेष्ठीने राज्यातील अनेक जिल्ह्यात युवक अध्यक्षांच्या नव्याने निवडी केल्या आहेत. त्यासाठी ऑनलाइन पध्दतीने सभासद नोंदणीचा निकष लावण्यात आला होता. डोंगरे यांनी विद्यार्थी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम करताना विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नांवर विद्यापीठाला जाब विचारला. वेळप्रसंगी त्यांनी आंदोलनेही केली. त्यानुसार डोंगरे हे दहा हजार 214 मते घेऊन त्या पदावर विराजमान झाले. ग्रामीणचे युवक जिल्हाध्यक्ष म्हणून पंढरपूरचे सुनंजय पवार यांची निवड झाली आहे. त्यांनी 10 उमेदवारांहून अधिक मते मिळविली. त्यांच्या निवडीबद्दल माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे, आमदार प्रणिती शिंदे यांच्यासह कॉंग्रेस नेत्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
युवक कॉंग्रेस पदाधिकारी निवडणूक निकाल
सोलापूर जिल्हा युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी पंढरपूरचे सुनंजय पवार विजयी
*सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी गणेश डोंगरे विजयी*
*शहर मध्य विधानसभा युवक कॉंग्रेस अध्यक्षपदी वाहिद बिजापुरे विजयी*
*शहर उत्तर विधानसभा युवक कॉंग्रेस अध्यक्षपदी महेश लोंढे विजयी*
*सोलापूर दक्षिण विधानसभा युवक कॉंग्रेस अध्यक्षपदी महेश जोकारे विजयी*
महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेस जनरल सेक्रेटरी पदी सुमीत भोसले विजयी
महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेस सेक्रेटरी पदी प्रवीण जाधव विजयी
*सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी गणेश डोंगरे विजयी*
*शहर मध्य विधानसभा युवक कॉंग्रेस अध्यक्षपदी वाहिद बिजापुरे विजयी*
*शहर उत्तर विधानसभा युवक कॉंग्रेस अध्यक्षपदी महेश लोंढे विजयी*
*सोलापूर दक्षिण विधानसभा युवक कॉंग्रेस अध्यक्षपदी महेश जोकारे विजयी*

















