सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील प्रस्तावित बोरामणी विमानतळ व्हावे आणि श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी वाचवण्यासाठी कारखान्याचे संचालक तथा मार्गदर्शक धर्मराज काडादी यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी कुमठे इथल्या सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्यापासून सोलापूर शहरातील होम मैदानावर भव्य असा मोर्चा काढण्यात आला. होम मैदानावर या मोर्चाचे रूपांतर सभेत झाले.
आपल्या भाषणात काडादी यांनी भाजपचे आमदार विजयकुमार देशमुखांवर नाव न घेता थेट टीका केली. ते म्हणाले, काही ठराविक लोक चिमणी पडावी, कारखाना बंद पडावा यासाठी व्यक्तिद्वेषपणे काम करत आहेत. सिद्धेश्वर देवस्थानचे काम चांगल्या पद्धतीने सुरू आहे, कारखाना, कॉलेज, शिक्षण संस्था, मुलींचे इंजिनिअरिंग कॉलेज, कॅन्सर हॉस्पिटल सुरू केले हेच त्यांना बघवत नाही.
चिमणीचे कारण सांगून इतर प्रकल्पाला विरोध करत आहेत, शासन दरबारी, कोर्ट कचेरीत भांडत आलो, कोट्यवधी रुपये खर्च झाले आहेत.
जाणीवपूर्वक चिमणीची एनओसी मागितली जाते, चिमणी कोणत्याही परिस्थितीत आडवी येत नाही, विकास मंचची मंडळी जाणीवपूर्वक त्रास देत आहेत, नेमका विकास काय हेच त्यांना माहिती नाही, मी हत्यार दाखवायला गेलो नव्हतो, आंदोलन करा, कायदेशीर लढा मला वाटले तर मी कधीही मारू शकलो असतो, सिद्धेश्वर देवस्थान मध्ये भांडणे लावायचे, इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये सत्तेचा गैरवापर करून दंड लावायचा,
विकास मंचची मंडळी यांच्यात दम नाही यांच्या मागे दुसराच आहे. आता समाजाने या नेतृत्वाला बदलण्याची वेळ आली आहे असे सांगत वेळ आली तर मी स्वतः मैदानात असेन असा इशारा त्यांनी दिला. पहा ते काय म्हणाले..
यावेळी माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, माजी आमदार सिद्रामप्पा पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष काका साठे, माजी आमदार दिलीप माने, दूध संघाचे संचालक सुरेश हसापुरे, माकपचे माजी आमदार आडम मास्तर, माजी आमदार शिवशरण पाटील, माजी सभापती इंदुमती अलगोंडा पाटील, माजी महापौर महेश कोठे, काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे, कारखान्याचे अध्यक्ष अण्णाराज काडादी, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष भारत जाधव, स्वामी समर्थ सूत मिलचे चेअरमन राजशेखर शिवदारे, काँग्रेस नेते विजयकुमार हत्तुरे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आनंद तानवडे, शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश वानकर, माजी सभापती अप्पाराव कोरे, प्रहारचे जमीर शेख, काँग्रेसचे दक्षिण तालुकाध्यक्ष हरीश पाटील, गुरुसिद्ध म्हेत्रे, बाजार समिती संचालक अमर पाटील, माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील, माजी नगरसेवक विनोद भोसले, आप्पासाहेब पाटील, माजी आमदार विश्वनाथ चाकोते, बोरामणी विमानतळ संघर्ष समितीचे राजू चव्हाण, माजी सभापती जालिंदर लांडे, शेतकरी संघटनेचे शिवानंद पाटील, माजी विरोधी पक्षनेते सुरेश पाटील, भाजप नेते अशोक निंबर्गी, काँग्रेसचे विजय शाबादी, कारखान्याचे उपाध्यक्ष सिद्धाराम चाकोते, राष्ट्रवादीचे आनंद मुस्तारे, डॉ भीमाशंकर बिराजदार, बाजार समिती संचालक केदार उंबरजे, ज्येष्ठ नेते जाफरताज पाटील, माजी सभापती अशोक देवकते, जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकर देशमुख, काँग्रेसचे विलास लांडे सर्वपक्षीय नेते हजारो शेतकरी यावेळी उपस्थित होते.
मोर्चातून केल्या काडादी यांनी याखालील मागण्या….
बोरामणी विमानतळ फॉरेस्टची जागा आहे त्याची अदलाबदल करण्यात यावी, कारखान्याच्या सर्व परवानग्या मिळाल्या पाहिजेत, महापालिकेत सर्व परवानगी मिळाव्यात.




















