सोलापूर : राज्यातील एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस सरकारने अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला असून आता वयाची 75 वर्षे पूर्ण झालेल्या नागरिकांना संपूर्ण महाराष्ट्रात एसटीचा प्रवास मोफत करण्यात आला आहे. मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 75 वर्ष पूर्ण असलेल्या 5 ज्येष्ठांच्या उपस्थितीत या योजनेचा शुभारंभ करण्यात आला.
आधार कार्ड, पॅन कार्ड अथवा मतदान कार्ड असे वयाचे कोणतेही एक ओळखपत्र आवश्यक आहे. संपूर्ण महाराष्ट्रात प्रवास तर मोफत आहेच मात्र महाराष्ट्राच्या एसटीतून इतर राज्यात जाण्यासाठी प्रवास मोफत करण्यात आला आहे. सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले जात आहे.


















