भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी खासदार किरीट सोमय्या हे शनिवारी सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाकडून करण्यात आलेला उपाय योजनेवर महापौर तसेच पालिका आयुक्ता सोबत आढावा बैठक घेतली बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना माजी खासदार किरीट सोमय्या म्हणाले ,राज्यातील करोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्या करिता राज्यातील महाविकास आघाडी सरकार मोठा भ्रष्टाचार करत आहे तसाच भ्रष्टाचार सोलापूर शहरात देखील झाला असून पालिकेचे आयुक्त हे मृत्युदराचा मुळ आकडे लपवित असल्याचा आरोप यावेळी किरीट सोमय्या यांनी केला.
अनिल देशमुख व अनिल परब यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा नंबर लागणार असून ते लवकरच भ्रष्टाचाराच्या आरोपात असल्याचे दिसून येईल असा आरोप देखील किरीट सोमय्या यांनी यावेळी केला पहा किरीट सोमय्या यांचा हा व्हिडीओ 👇👇👇👇



















