सोलापूर-ब्रह्मदेवदादा माने सहकारी बँक कर्मचारी सांस्कृतीक मंडळाच्या श्री गणेश प्रतिष्ठापना पुजेचे वेळी त्यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी बँकेचे मार्गदर्शक माजी आमदार दिलीप माने,चेअरमन चंद्रकांत कुलकर्णी, सौ.रोहिणी कुलकर्णी यांच्या हस्ते श्री.प्रतिष्ठापना विधीवत पूजा करण्यात आली.
गेली दोन वर्षे संपुर्ण जगावर असलेले विध्न दूर करत गणरायाचे आगमन झाले असून यापुढे कसलेही विध्न नको सर्वत्र सुख-शांती-समृद्धी नांदावी अशी भावना माजी आमदार दिलीपराव माने यांनी व्यक्त केली..
यावेळी कर्मचारी मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत म्हेत्रे,बँकेचे शाखाधिकारी, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.प्रारंभी बँक कर्मचाऱ्यांनी लेझीम खेळत श्री गणरायाचे जल्लोषात स्वागत केले.




















