सोलापूर- सहकार तपस्वी स्व. ब्रह्मदेवदादा माने प्रतिष्ठानचे वतीने देण्यात येणाऱ्या शैक्षणिक, सामाजिक, कृषी-सहकार,महिला जागृती तसेच भारताचे सर्वप्रथम वैयक्तिक आँलिम्पिक पदक विजेते स्व.पै खाशाबा जाधव क्रिडा पुरस्कारासाठी संस्था/व्यक्तीनी योग्य माहितीसह प्रस्ताव 5 फेब्रुवारी पर्यंत सादर करण्याचे आवहान प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा माजी आमदार दिलीपराव माने यांनी केले आहे.
सोलापूर जिल्ह्यात अंत्यत प्रतिष्ठेचे समजले जाणारे व देखण्या आयोजनात देण्यात येणाऱ्या मा. ब्रह्मदेव माने प्रतिष्ठानचे शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था/व्यक्तींसाठी1)कर्मवीर भाऊराव पाटील शैक्षणिक पुरस्कार, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था/ व्यक्तीसाठी2) छत्रपती राजर्षी शाहू सामाजिक पुरस्कार,शेती अथवा सहकार क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था/व्यक्तीसाठी 3)महात्मा फुले कृषी- सहकार पुरस्कार ,महिला क्षेत्रात जनजागृती व उल्लेखनीय काम करणाऱ्या महिला संस्था/महिला व्यक्तीसाठी 4)मातोश्री कै.सौ. सुमित्रादेवी माने महिला जागृती पुरस्कार तसेच यावर्षीपासुन नव्याने क्रिडा क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था खेळाडूसाठी5)स्व.पै.खाशाबा जाधव क्रिडा पुरस्कारासाठी 5 फेब्रुवारीपर्यंत आवश्यक माहिती,संदर्भासह प्रस्ताव ब्रह्मदेवदादा माने सहकारी बँक सिध्देश्वर पेठ जिल्हा परिषद समोर सोलापूर या कार्यालयात पाठवावेत.
सदर प्रस्तावासंदर्भात त्या-त्या क्षेत्रातील तज्ञाकडून संस्थाची/व्यक्तीची निवड करण्यात येईल तरी जिल्ह्यात शैक्षणिक, सामाजिक, कृषी-सहकार, महिला जागृती व क्रिडा क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती संस्थांनी आवश्यक माहितीसह प्रस्ताव वेळेत पाठवण्याचे आवहान संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार दिलीपराव माने यांनी केले आहे.