दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी येथे श्री संत सेवालाल महाराज यांची 284 वी जयंती मोठया थाटात साजरी करण्यात आली. सुरवातीला संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन आमदार सचिन कल्याणसेट्टी यांच्या हस्ते करण्यात आली. नंतर संपुर्ण बोरामणी गावात भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी लेज़ीम पथक, बंजारा लेडीज पारंपरिक नृत्य साजरा करत स्थापना करण्यात आली.
यावेळी खुप मोठ्या संख्येने बंजारा कार्यकर्त उपस्थीत होते. या मिरवणूकी साठी गावचे सरपंच व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. या मिरवणूकी साठी मोहोळकर तांडा, कारंजे तांडा, मलिक तांडा,व चिरका तांडा या सगळ्यांनी मिळुन मिरवणूक यशश्वीरित्या पार पाडली.



















