सोलापूर : महाराष्ट्र राज्य शासनाने बीपीएल रेशनकार्ड, अंत्योदय योजना, अन्नसुरक्षा योजना रेशनकार्ड धारकांसाठी 100 रुपयांत 1किलो साखर,1किलो तेल,1चनाडाळ,1किलो रवा,असे दिवाळी पॉकेज हे जाहीर केले आहे महाराष्ट्र शासनाच्या या निर्णयाचे बसपा सोलापूर शहर मध्य विधानसभा शाखेने स्वागत केले.
गेल्या कित्येक वर्षांपासून अन्नधान्य बंद असलेले NPH रेशनकार्ड धारकांना देखील दिवाळी सणाचे पॉकेज जाहीर करण्यात यावे जेणेकरून अन्नधान्य बंद असलेले NPH रेशनकार्ड धारकांना तात्पुरता तरी समाधान मिळेल.
यावेळी उपस्थित बसपा सोलापूर शहर मध्य विधानसभा अध्यक्ष इरफान मैंदर्गी, शहर मध्य विधानसभा उपाध्यक्ष पप्पू उडाणशिवे, शहर मध्य कोशाध्यक्ष मुसेफ फनिबंद, सैपन वळसंगकर, अनवर दामाद यांची उपस्थिती होती.



















