Tuesday, March 17, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

प्रा. अजय दासरी प्रेसिडेंट तर अध्यक्षपदी भालचंद्र बोम्मेन ; शिवसेनेच्या वतीने झाल्या या निवडी

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
16 March 2022
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : सोलापूर शहरातील वस्त्रोद्योग, हातमाग, गारमेंट व लघु उद्योगाला चालना देण्यासाठी व  तेलुगू भाषिक बांधवांमधून नवउद्योजक घडविण्यासाठी शासनाने श्री महर्षी मार्कंडेय महामुनी आर्थिक विकास महामंडळाची स्थापना त्वरित करावी अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी केली.

>
शिवसेना प्रणित शिव वस्त्रोद्योग महासंघाची स्थापना करुन प्रेसिडेंट प्रा. अजय दासरी यांच्या नेतृत्वाखाली नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. या नव्या कार्यकारणीतील पदाधिकारी व सदस्यांना मानाचा भगवा फेटा बांधून व गळ्यात शिवसेनेचे उपरणे घालून शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे व शहरप्रमुख गुरुशांत धुत्तरगांवकर यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले, त्याप्रसंगी  बरडे बोलत होते. 

ते पुढे म्हणाले की, शिवसेना प्रणित संघटनेत कार्य करित असलेल्या प्रत्येक उद्योजकाच्या समस्या यापुढे आमच्या समस्या मानून खंबीरपणे आम्ही सोबत उभे राहू. सध्या राज्यात ‘आपले सरकार’ असून या ठाकरे सरकारच्या माध्यमातून सोलापूर शहराच्या पूर्व विभागाला गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी कटिबध्द राहू. लवकरच मुख्यमंत्री मा. उध्दव ठाकरे यांच्यासह उद्योग मंत्री सुभाष देसाई, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक लावण्यासाठी वेळ घेणार असल्याचेही पुरुषोत्तम बरडे यांनी सांगितले.

शिव वस्त्रोद्योग महासंघाच्या कार्यकारीणीला शुभेच्छा देताना शहरप्रमुख गुरुशांत धुत्तरगांवकर म्हणाले की, आपल्या सर्वांची जबाबदारी आता वाढली आहे. शासन दरबारी समस्या मांडत असतानाच, शासनाच्या योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहचवून शहराचा विकास साधण्यात योगदान देणे अपेक्षित आहे.

प्रेसिडेंट प्रा. अजय दासरी यांनी उद्योजकांच्या व्यथा मांडल्या व अक्कलकोट रोड एमआयडीसी मिश्र झोन जाहीर होण्याची, येथील अंतर्गत रस्ते, मुबलक पाणी व ड्रेनेज व्यवस्था आदी मूलभूत सुविधांसाठी भरीव निधीची गरज असल्याचे सांगतानाच सोलापूरला ‘टेक्सटाईल सिटी’ जाहीर करुन सुविधा पुरविल्यास उद्योजकांचे स्थलांतरण होणे थांबेल व त्याकरिता हा महासंघ पूर्ण जोमाने कार्यरत राहील अशी ग्वाही दिली. कार्यक्रमाचं प्रास्ताविक अध्यक्ष भालचंद्र बोम्मेन यांनी मांडलं.

शिवसेना प्रणित शिव वस्त्रोद्योग महासंघाची आज जाहीर झालेली कार्यकारिणी अशी – प्रेसिडेंट – प्रा. अजय दासरी, अध्यक्ष – भालचंद्र बोम्मेन, उपाध्यक्ष – हरी पासकंटी, विठ्ठल कनकट्टी व बालाजी बोल्ली, सरचिटणीस – अनिल दासरी, सहचिटणीस – जयप्रकाश मुदगुंडी व शिवा बिज्जरगी, कोषाध्यक्ष – डॉ. वेंकटेश सादुल, कार्यालय प्रमुख – राजेश वडीशेरला, कार्यकारिणी सदस्य – मदनमोहन बुर्गल, जगदीश कलकेरी, दत्तात्रय कोंडा, राजमहेंद्र येमुल, किशोर मादास, मुरली गंजी, जालंदर चन्ना, गिरीष रंगदळ, गौतम जक्कन, सतीश नंदाल, नीतीन आदोने 

या कार्यक्रम प्रसंगी माजी नगरसेवक सर्वेशम येमुल, गिरीष सरवदे, वैशाली कुलकर्णी, सारिका साठे आदींचीही उपस्थिती होती.

SendShareTweetSend
Previous Post

Video ! उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आभार 🙏🙏🙏 आमदार ड्रायव्हर व पीए यांच्या पगारात इतक्या हजाराची वाढ

Next Post

‘झुंड’चा खरा नायक विजय बारसे हे सोलापुरात ; प्रस्थापितांसाठी नव्हे, तर उपेक्षितांसाठी जगलो! मास्तरांनी केला गौरव

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

'झुंड'चा खरा नायक विजय बारसे हे सोलापुरात ; प्रस्थापितांसाठी नव्हे, तर उपेक्षितांसाठी जगलो! मास्तरांनी केला गौरव

ताज्या बातम्या

खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

16 March 2026
बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

15 March 2026
सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

12 March 2026
सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

10 March 2026
बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

9 March 2026
नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

4 March 2026
प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

27 February 2026
बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

12 February 2026

क्राईम

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1972516
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group