सोलापुर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुक २०२२ चे आरक्षण सोडत पार पडली असुन दि.२५ मे २०२२ रोजी झालेल्या छत्रपती रंगभवन मध्ये प्रभाग क्रं.३२ मध्ये १ पुरूष आणि २ महिला असे आरक्षण सोडत झाली होती. त्यानंतर दि.२९ जुलै रोजी झालेल्या आरक्षणात प्रभाग ३२ अ मध्ये ओ.बी.सी राखीव पुरूष आरक्षण थेट पध्दतीने करण्यात आले.
प्रभाग ३२ ब मध्ये देखील सर्वसाधारण महिला थेट आरक्षण दिले आणि प्रभाग ३२ क मध्ये सर्वसाधारण आरक्षण दिले गेले म्हणजेच प्रभाग ३२ मधील १ पुरूष आणि २ महिला आरक्षण नकळतपणे उडविले. त्या जागी २ पुरूष आणि १ महिला असे आरक्षण करून प्रभागातील महिला उमेदवारावर गदा आणली असुन एका प्रभागात दोन ठिकाणी थेट आरक्षण घेण्यात आले, ते शासकीय तरतुदीनुसार असले तरी थेट आरक्षणासाठी निवडलेले प्रभाग हे कोणत्या निकषानुसार घेतले गेले.
एका प्रभागात दोन ठिकाणी थेट आरक्षण घेत येत नसून ते चिठ्ठीद्वारे झाले पाहिजे अशी तक्रार करत प्रभाग ३२ मध्ये ओ.बी.सी महिला आरक्षण दयावे अशी हरकत घेत माजी सभापती अनुराधा काटकर व त्यांचे चिरंजीव श्रीधर काटकर यांनी हरकत घेत मुख्य निवडणुक अधिकारी आणि राज्य निवडणुक आयोगाकडे तक्रार केली आहे. यावर योग्य निर्णय न झाल्यास न्यायालयात दाद मागणार असल्याचे श्रीधर काटकर यांनी सांगितले .

















