सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला द्यावा या मागणीसाठी आमदार रोहित पवार यांनी पुढाकार घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांना पत्रकारांनी याविषयी प्रश्न विचारला असता कोण रोहित पवार? असे म्हणत त्यांनी ते पोरकट आहेत असा शब्द वापरला. यामुळे सोलापुरातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संतापाचे वातावरण आहे.
राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता राष्ट्रवादीच्या युवा कार्यकर्त्यांनी एकत्र येत काँग्रेस भवनाच्या बाजूला कोण आहेत रोहित पवार हे सांगणारे भले मोठे पोस्टर आणून लावले एका कार्यक्रमात आमदार रोहित पवार आणि आमदार प्रणिती शिंदे हे एकत्र आलेला तो फोटो होता ‘आता कसे वाटते’ असे म्हणून त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली….


















