Tuesday, March 24, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

पोलिसांना पाहताच मोटारसायकलस्वार गाडी सोडून फरार ; स्विफ्ट कारमधून होत होती गोवानिर्मित दारुची वाहतूक ; पुढे काय झाले…..

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
6 December 2022
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पंढरपूरच्या पथकाने 5 डिसेंबर रोजी मोहोळ तालुक्यात खंडाळी गावाच्या हद्दीत एका मारुती स्विफ्ट कारमधून गोवा राज्य निर्मित विदेशी मद्याचा साठा जप्त केला तसेच 6 डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास सोलापूरच्या पथकाने दक्षिण सोलापूर तालुक्यातील बक्षीहिप्परगा ताडंयावरील हातभट्ट्यांवर धाडी टाकून 3 लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला. 

सविस्तर वृत्त असे की, राज्य उत्पादन शुल्क विभाग पंढरपूरचे प्रभारी दुय्यम निरिक्षक अंकुश आवताडे यांना गोवा  दारूच्या वाहतुकीबाबत मिळालेल्या खात्रीलायक बातमी नुसार त्यांनी 5 डिसेंबर मंगळवारी सायंकाळच्या सुमारास मोहोळ तालुक्यातील खंडाळी ते खंडाळी पाटी रोडवर सापळा रचला असता त्यांना एक विना नंबर प्लेट बजाज प्लॅटिना मोटरसायकलीवरुन एक इसम संशयितरीत्या येतांना दिसला, त्याला थांबण्याचा इशारा केला असता तो मोटरसायकल जागीच सोडून फरार झाला.

 यावरुन संशय बळावल्याने पाठीमागून येणा-या एक मारुती स्विफ्ट कार क्रमांक MH12 HV 5790 या वाहनास थांबवून पंचांसमक्ष वाहनाची झडती घेतली असता त्यात देशी – विदेशी दारुचा साठा दिसून आला. वाहनचालक बालाजी बबन खडके, रा. टेंभुर्णी ता. माढा या इसमास जागीच ताब्यात घेऊन त्याचेविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 च्या कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या गुन्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारमधून गोवा राज्य निर्मित एड्रियल व्हिस्कीच्या 750 मिली क्षमतेच्या 180 बाटल्या, रॊयल स्टॅग व्हिस्कीच्या विदेशी मद्याच्या 180 मिली क्षमतेच्या 50 बाटल्या,  इंपेरियल ब्ल्यू व्हिस्कीच्या विदेशी मद्याच्या 180 मिली क्षमतेच्या 48 बाटल्या, देशी दारुच्या 180 मिली क्षमतेच्या 144  बाटल्या, बनावट बुचे जप्त केले असून जप्त केलेल्या दारूची किंमत एक लाख 34 हजार इतकी असून दोन्ही वाहनासह एकूण सहा लाख दोन हजार 780 किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्यातील दुसरा आरोपी सचिन बन्सोडे हा फरार असून त्याचा शोध सुरु आहे.   

तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अ विभाग, ब विभाग व भरारी पथकाने 6 डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास दक्षिण सोलापूर तालुक्यातील बक्षीहिप्परगा तांडा येथील सेवा तांड्यावर छापा टाकून नवनाथ खेमा राठोड याच्या घरातून 8 रबरी ट्यूबमध्ये साठवून ठेवलेली 640 लिटर व द्वारकाबाई कोंडीबा राठोड, रा. सेवा तांडा हीच्या घरातून 22 रबरी ट्यूबमधून 2200 लिटर हातभट्टी दारु जप्त केली. तसेच पथकाने गणपत तांडा परिसरातील हातभट्टी ठिकाणांवर धाडी टाकून विजय मानसिंग चव्हाण व संजय थावरु पवार यांच्या ताब्यातून हातभट्टी दारु तयार करण्याकरीता लागणारे 36 प्लास्टीक बॅरेल मध्ये साठवणूक केलेले गुळमिश्रित रसायन जप्त करुन जागीच नष्ट केले. तांड्यावरील संपूर्ण कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभागाने दोन हजार आठशे चाळीस लिटर हातभट्टी दारु व सात हजार दोनशे लिटर रसायन असा एकूण 3 लाख सात हजार सहाशे रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या आदेशानुसार संचालक सुनिल चव्हाण, विभागीय उप आयुक्त अनिल चासकर, अधीक्षक नितीन धार्मिक व उपअधीक्षक  आदित्य पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निरिक्षक सूरज कुसळे, संभाजी फडतरे, सदानंद मस्करे, दुय्यम निरिक्षक अंकुश आवताडे, शंकर पाटील, उषाकिरण मिसाळ, सुनिल पाटिल, गणेश उंडे, सहायक दुय्यम निरिक्षक जीवन मुंढे, सिद्धराम बिराजदार, गजानन होळकर, जवान गणेश रोडे, विकास वडमिले, मलंग तांबोळी, भाग्यश्री शेरखाने, प्रियंका कुटे, अनिल पांढरे, अण्णासाहेब कर्चे, प्रशांत इंगोले व वाहनचालक रशीद शेख, रामचंद्र मदने व मारुती जडगे  यांच्या  पथकाने पार पाडली.

SendShareTweetSend
Previous Post

दक्षिण सोलापूर पंचायत समितीत महापरिनिर्वाण दिनी अभिवादन

Next Post

सावरकरांनी एक नाही तर पाच वेळा माफीनामा लिहून दिला, नंतर 24 वर्षे इंग्रजांविरोधात बोट उचलले नाही ; सोलापुरात माकप नेते अशोक ढवळे यांचा दावा

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सावरकरांनी एक नाही तर पाच वेळा माफीनामा लिहून दिला, नंतर 24 वर्षे इंग्रजांविरोधात बोट उचलले नाही ; सोलापुरात माकप नेते अशोक ढवळे यांचा दावा

ताज्या बातम्या

समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त जुळे सोलापुरात भक्तांची मांदियाळी ; हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त जुळे सोलापुरात भक्तांची मांदियाळी ; हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

21 March 2026
खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

16 March 2026
बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

15 March 2026
सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

12 March 2026
सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

10 March 2026
बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

9 March 2026
नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

4 March 2026
प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

27 February 2026

क्राईम

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1973104
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group